दोषी कंत्राटदारांवर कारवाई - रणजीत पाटील

 Vidhan Bhavan
दोषी कंत्राटदारांवर कारवाई - रणजीत पाटील

मुंबई - मुंबईतल्या चांगल्या स्थितीतल्या रस्त्यांचीही दुरूस्ती करण्याचा निर्णय घेऊन गैरव्यवहार करण्यात आला असून त्यासंबंधित अभियंते, कंत्राटदार आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. निकषात बसत नसतानाही कामं केली असतील तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत बोलताना दिली.

2016 पूर्वीच्या 250 रस्त्यांच्या कामांबाबत चौकशी करण्यात आली. त्यात दोषी आढळलेल्या संबंधित कंत्राटदार, अभियंता आणि कर्मचारी यांना अटक करण्यात आल्याची माहितीही यावेळी रणजीत पाटील यांनी दिली. मुंबई शहरात सुस्थितीत असलेल्या रस्त्यांच्या दुरूस्ती प्रस्तावाला महानगरपालिकेने मान्यता दिल्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यावेळी ही माहिती पाटील यांनी दिली.

Loading Comments