Advertisement

हँकॉक पुलाचा बांधकाम खर्च पावणे दोन कोटींनी वाढला

माझगाव-सँडहस्टर्ड शिवदास चापसी येथील हँकॉक पूल हा जुना आणि वापरण्यास असुरक्षित असल्याने रेल्वेने ते तोडून टाकले. त्यामुळे नवीन पुलाची बांधणी करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची निवड केली. यामध्ये पहिल्या कंत्राटदाराची निवड न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द केल्यानंतर दुसऱ्यांदा निविदा मागवून नवीन कंत्राटदाराची निवड केली होती. याला स्थायी समितीचीही मान्यता मिळाल्यानंतर या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

हँकॉक पुलाचा बांधकाम खर्च पावणे दोन कोटींनी वाढला
SHARES

हँकॉक पुलासाठी नव्याने कंत्राटदाराची निवड झाल्यानंतर या कामाचाही शुभारंभ करण्यात आला आहे. पण या कामाचा शुभारंभ केल्यानंतर आता नव्याने अभियांत्रिकी सेवा घेण्याची शिफारस रेल्वेने केली आहे. त्यामुळे या नवीन अभियांत्रिकी सेवेसाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार असून स्थायी समितीने यापूर्वी मंजूर केलेल्या ५१.७० कोटी रुपयांच्या खर्चात आणखी १.८० कोटींची भर पडली आहे.

'या' कामाचा शुभारंभ

माझगाव-सँडहस्टर्ड शिवदास चापसी येथील हँकॉक पूल हा जुना आणि वापरण्यास असुरक्षित असल्याने रेल्वेने ते तोडून टाकले. त्यामुळे नवीन पुलाची बांधणी करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची निवड केली. यामध्ये पहिल्या कंत्राटदाराची निवड न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द केल्यानंतर दुसऱ्यांदा निविदा मागवून नवीन कंत्राटदाराची निवड केली होती. याला स्थायी समितीचीही मान्यता मिळाल्यानंतर या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

खर्चात भर

या पुलाच्या बांधकामासाठी साई प्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली असून त्यांना यासाठी सल्लागार सेवेसह एकूण ५१.७० कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं आहे. पण आता मध्य रेल्वेने हँकॉक पुलाच्या पुनर्बांधकामासाठी राईट्स लि. किंवा इरकॉन इंटरनॅशनल लि. यांना रेल्वे हद्दीतील कामाची देखरेख आणि आवश्यक अभियांत्रिकी सेवेसाठी नियुक्ती करण्यास महापालिकेला सुचवलं होतं. 

महापालिकेने दोन्ही संस्थांकडून अर्ज मागवले असता राईट्स लि. यांनीही यासाठी सहमती दर्शवली आहे. यासाठी राईट्स लि. या संस्थेला १ कोटी ८० लाख रुपये मोजले जाणार आहे. रेल्वेच्या सूचनेनुसार या संस्थेची निवड करण्यात आली असल्याची माहिती पूल विभागाचे प्रभारी प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी म्हटलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा