गटाराच्या झाकणाची धोक्याची घंटा

 Lower Parel
गटाराच्या झाकणाची धोक्याची घंटा

लोअर परळ - बाबाजी जामसांडेकर मार्ग येथील गटाराच्या झाकणाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. अवजड वाहनांमुळे या गटारावरील झाकण खोलवर खचले गेले आहे. बाबाजी जामसांडेकर मार्ग प्रवाशांच्या रोजच्या मार्गात येत असल्याने झाकण तुटून वाहनाचे चाक किंवा पादचाऱ्यांचा पाय अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. सदर नागरिकांच्या माहिती नुसार या मार्गावर ४ महिन्यांपूर्वी जलवाहिनीचे काम करण्यात आले होते. त्यावेळी या गटारावर नवीन लोखंडी झाकण बसवण्यात आले होते. मात्र या झाकणाचा ४ महिन्यातच दुरवस्था झाल्याने या प्रकरणाची पालिकेत रीतसर तक्रार १५ दिवसांपूर्वी अमोल देसाई या स्थानिकाने नोंदवली होती. मात्र या बाबत पालिकेची उदासीनता दिसून येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Loading Comments