Advertisement

मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून तब्बल ५८ कोटींचा दंड वसूल


मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून तब्बल ५८ कोटींचा दंड वसूल
SHARES

राज्यात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव वाढत असून, राज्य सरकार सतत सर्वसामान्यांना वारंवार कोरोना संबंधित सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यासाठी आवाहन करत आहे. परंतु, तरीही अद्यापही अनेकांकडून सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर टाळला जात असून या अशा बेफिकीर नागरिकांवर मुंबई पालिकेने (bmc) कारवाई करत तब्बल ५८ कोटींचा दंड वसूल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस (mumbai police) तसंच रेल्वेकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण ५८ कोटी ४२ लाख ९९ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करत मुंबई पोलिसांनी ७ कोटी ६२ लाख ७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर रेल्वेने एकूण ५० लाख ३९ हजार २०० इतका दंड वसूल केला आहे.

  • पश्चिम रेल्वे (२२ लाख ६३ हजार ४००)
  • हार्बर रेल्वे (६ लाख ५७ हजार ६००)
  • मध्य रेल्वे (२१ लाख १८ हजार २००) 

मास्कविना फिरणाऱ्यांमुळे अन्य नागरिकांना संसर्गाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करावा, असं आवाहन पालिकेकडून पुन्हा करण्यात आलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा