Advertisement

'ते' पीपीई किट घालून कोरोना रुग्ण पळाला; रुग्णालयात धावपळ

राज्यात सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत.

'ते' पीपीई किट घालून कोरोना रुग्ण पळाला; रुग्णालयात धावपळ
SHARES

राज्यात सद्यस्थितीत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच एक भितीदायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील एक कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २१ वर्षीय तरुणानं पळ काढल्यानं रुग्णालयात एकच धावपळ सुरु झाली.

याप्रकरणी पोलिसांनी या तरुणाला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून अटक केली आहे. २१ वर्षीय तरुणाला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

यावेळी या तरुणाने कचऱ्यात पडलेला पीपीई किट घालत रुग्णालयातून पळ काढला होता. यानंतर एमआरए पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसंच त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. अखेर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून त्याला अटक कऱण्यात आली. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याखाली त्याला अटक केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा