Advertisement

रविवार, २८ नोव्हेंबर रोजी 'या' रेल्वे सेवा राहतील प्रभावित

मुंबई विभागातील सेंट्रल आणि हार्बर लाईनवरील या रेल्वे प्रभावित होतील.

रविवार, २८ नोव्हेंबर रोजी 'या' रेल्वे सेवा राहतील प्रभावित
SHARES

मध्य रेल्वे, मुंबई विभागातील सेंट्रल आणि हार्बर लाईनवर २८ नोव्हेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

सेंट्रल लाईन

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत.

मुलुंडहून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील व गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

कल्याणहून सकाळी १०.३७ ते दुपारी ३.४१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या / अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड इथं अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यान सुटणाऱ्या / येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या सेवा नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटं उशिरानं आगमन होईल / सुटतील.

हार्बर लाइन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर लाइन सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान

सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वाशी / बेलापूर / पनवेल साठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा आणि सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वांद्रे / गोरेगाव साठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी राहील.

पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा