Advertisement

दादरच्या 1 रुपयांत चिकित्सालयावर म. रेल्वेकडून कारवाई


दादरच्या 1 रुपयांत चिकित्सालयावर म. रेल्वेकडून कारवाई
SHARES

रेल्वे प्रवाशांना आरोग्याच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर 1 रुपयात उपचार करणारी चिकित्सालये उभारण्यात आली आहेत. सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दादरच्या चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत म्हणजे बुधवारी मध्य रेल्वेने चिकित्सालयाच्या बाजूला फार्मसी रूम बांधण्याची परवानगी नसल्याचे कारण देत हा फार्मसी रूम पाडण्याचे आदेश दिले. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीच ही रूम बांधण्याचे आदेश दिले होते हे विशेष.

दादर पूर्वेकडील रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील वैद्यकीय रूमजवळील फार्मसी रूम पाडण्यात आली आहे. फार्मसी रूम बांधण्याआधी मध्य रेल्वेची परवानगी घेण्यात आली होती. पण, मध्य रेल्वेच्याच काही अधिकाऱ्यांनी ही रूम पाडण्यास सांगितले. अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादाचा फटका प्रवासी रुग्णांना बसल्याची प्रतिक्रिया 1 रुपयांत उपचार चिकित्सालयाचे प्रमुख डॉक्टर राहुल घुले यांनी दिली.

मागील तीन महिन्यांपासून या फार्मसीचे काम सुरु होते. त्यावेळेस या अधिकाऱ्यांनी आम्हाला अडवले नाही. पण जेव्हा हे चिकित्सालय सुरु झाले, तेव्हा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही फार्मसी रूम स्टेशन मास्टरच्या माध्यमातून तोडायला सांगितली, अशी माहितीही घुले यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

गेल्या तीन दिवसांत दादरच्या या चिकित्सालयात जवळपास 250 प्रवाशांनी तपासणी केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा