Advertisement

कांजुरमार्ग स्टेशनवर पावडर रूम, वॉश बेसिनसह मेकअपचीही सोय

पावडर रुममध्ये शौचालयाची सुविधा, वॉश बेसिन आणि आरसा असलेली खोली आहे.

कांजुरमार्ग स्टेशनवर पावडर रूम, वॉश बेसिनसह मेकअपचीही सोय
SHARES

मार्गावर प्रवास करणा-या महिला प्रवाशांना शौचालयासह उर्वरित सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून पावडर रुम सुरु करण्यात आली. ठाणे आणि मुलुंडनंतर आता कांजुरमार्ग रेल्वे स्थानकांवरही पावडर रुमचा शुभारंभ करण्यात आला आहे. शिवाय एलटीटी, घाटकोपर आणि चेंबूर रेल्वे स्थानकांवरही पावडर रुम सुरु केली जाणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

कांजूरमार्ग स्थानकावर महिला प्रवाशांना स्वच्छता प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पावडर रुममध्ये शौचालयाची सुविधा, वॉश बेसिन आणि आरसा असलेली खोली आहे. जिथे महिला शौचालयाचा वापर करू शकतात, हात धुवू शकतात आणि काही मेकअप देखील करू शकतात. हे सार्वजनिक शौचालयांपेक्षा वेगळे आहे.

पावडर रूम ही मुळात रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप, बस स्थानक, मॉल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठीची खोली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने लेडीज पावडर रूम सुरू करण्याची योजना आखली आहे. या उपक्रमामुळे ५ वर्षांसाठी दरवर्षी ३९.४८ लाख महसूल मिळेल.

  • टॉयलेट वापराचे शुल्क प्रति व्यक्ती, प्रत्येक वेळेस १० रुपये असेल.
  • वूमन पावडर रूम ओळखपत्र असलेले वैध कर्मचारी असतील.
  • पावडर रूममध्ये कॅशलेस पेमेंट करता येईल.



दादर स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्मच्या डिझाइनमध्ये होणार बदल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा