Advertisement

मोनो रेलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता

मोनो रेलच्या ताफ्यात एक नवीन रेक सामील होणार आहे.

मोनो रेलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता
SHARES

मोनो रेलच्या ताफ्यात एक नवीन रेक सामील होणार आहे. मेक इन इंडियाअंतर्गंत हैदराबाद येथे मोनोच्या एका रेकचे निर्माण कार्य पूर्ण करण्यात आले आहे.

मोनोची ही नवीन रेक मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत येऊ शकतो. आणखी एक गाडी ताफ्यात दाखल झाल्याने मोनोच्या फेऱ्या वाढवल्या जाऊ शकतात. 

2014मध्ये मोनो रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. मोनोच्या लोकार्पणानंतर अद्याप एकही नवीन ट्रेन आणण्यात आली नव्हती. त्यामुळं प्रवाशांना ट्रेनसाठी खूप वाट पाहावी लागत होती. फेऱ्या कमी असल्याने मोनोला प्रवाशांचा प्रतिसादही कमी मिळत होता.

प्रवाशांची संख्या कमी असल्याने प्रशासनासाठी मोनो पांढरा हत्ती ठरला होता. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ला मोनो रेल्वेमुळं आत्तापर्यंत 500 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. 

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोनोच्या फेऱ्या वाढवण्यासाठी एमएमआरडीएने 10 नव्या रेकची ऑर्डर दिली होती. या 10 रेकपैकी एक रेक आगामी काही दिवसांत मुंबईत पोहोचणार आहे. हेही वाचा

दादर स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्मच्या डिझाइनमध्ये होणार बदल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा