Advertisement

विमानतळ परिसरातील नागरिकांचा महामोर्चा


विमानतळ परिसरातील नागरिकांचा महामोर्चा
SHARES

सांताक्रूझ - जीव्हीके आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या या मनमानी कारभाराविरोधात सांताक्रूझ विमानतळ परिसरातील नागरिकांनी रविवारी मोर्चा काढला. विमानतळाला लागून असलेल्या झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन करण्याच्या नावाखाली जीव्हीके आणि उपजिल्हाधिकार्‍यांनी या परिसरातील हजारो गोरगरीब झोपडीवासीयांना बेघर करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या काळात जीव्हीके आणि उपजिल्हाधिकार्‍यांनी सर्व्हेचा घोळ घालून संभ्रमित केले होते. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या झोपडीवासीयांचे छत्रपती शिवाजी महाराज प्राधिकरणाच्या जागेतच पुनर्वसन करण्यात यावे, अशी येथील झोपडीवासीयांची मागणी असून त्यासाठी कृती समितीतर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, शिवसेना आमदार विभागप्रमुख अ‍ॅड. अनिल परब यांना त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले.

संबंधित विषय
Advertisement