Advertisement

सीएसटीएमच्या इमारतीवर नऊ रंगांची रोषणाई


सीएसटीएमच्या इमारतीवर नऊ रंगांची रोषणाई
SHARES

नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगांचे वस्त्र परिधान करण्याचा ट्रेण्ड तरुणी आणि महिला वर्गात आहे. त्याचप्रमाणे आता मुंबईतील ऐतिहासिक वास्तू असलेल्या सीएसटीएमच्या इमारतीवरही नऊ दिवस नऊ रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

रेल्वेने सीएसटीएम स्थानकाच्या इमारतीवर रोषणाईच्या माध्यमातून नवरात्रीचे नऊ दिवस सर्वांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सीएसटीएम स्थानक खूपच आकर्षक दिसते आहे. प्रत्येक सण असो किंवा महत्त्वाचा दिवस याचे औचित्य साधून सिएसटीएमच्या इमारतीला विविध रंगाची विद्युत रोषणाई केली जाते. 


यंदा नवरत्रीतील विविध दिवसाच्या रंगाचे महत्त्व साधून दररोज विद्युत रोषणाईच्या माध्यमातून सीएसटीएम स्थानकावर वेगवेगळ्या रंगांची उधळण केली जात आहे.


हेही वाचा  - 

सीएसटी इमारतीवर गुलाबी रोषणाई


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा