Advertisement

आता रेल्वे कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण

८ मार्चपासून कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. पण, या विषयावर तोडगा निघाला नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाचा तीव्र निषेध करत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

आता रेल्वे कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण
SHARES

मध्य रेल्वेचे मुख्यालय असणाऱ्या सीएसएमटी येथे एक राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय तयार केलं जाणार आहे. पण, हा निर्णय या हेरिटेज इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात असल्याचं सांगत मध्य रेल्वे कामगार संघाचे कर्मचारी गेल्या २२ दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. पण, या उपोषणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे येत्या ३ एप्रिलपासून हे रेल्वे कर्मचारी वस्तूसंग्रहालयाविरोधात आमरण उपोषणाला बसणार आहेत.


साखळी उपोषणाला प्रतिसाद नाही

८ मार्चपासून कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. पण, या विषयावर तोडगा निघाला नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाचा तीव्र निषेध करत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


...म्हणून वस्तूसंग्रहालयाला विरोध

रेल्वे मंत्रालयाने हा एकतर्फी निर्णय घेतला असून सध्याचं मुख्यालय दुसरीकडे हलवून त्यात राष्ट्रीय वस्तूसंग्रहालय तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, फक्त शिफ्टींग करण्याचाच खर्च जवळपास ४१ करोड रुपये येणार आहे. ज्याच्यातून रेल्वेला काहीच फायदा होणार नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांशी चर्चा न करता हा निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना कुठे स्थलांतरीत करणार हे देखील अजून ठरलेलं नाही. आताचं जे छोटं संग्रहालय आहे त्यालाच पुरेसा प्रतिसाद नाही. शिवाय, हे नव्याने बांधलं जाणारं वस्तूसंग्रहालय फक्त पैशांचा चुराडा करण्याचं काम असल्याचा आरोपही मध्य रेल्वे कामगार संघाचे अध्यक्ष आर. पी. भटनागर यांनी केला आहे.


साखळी उपोषणाला २२ दिवस उलटले आहेत. पण, हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. रेल्वेकडे मुलभूत सुविधांसाठी पैसे नाहीत. सुरक्षेचा एवढा मोठा प्रश्न रेल्वेसमोर आहे. पण, ज्या गोष्टीतून काही उत्पन्न मिळणार नाही, यावर ते पैसे घालत आहेत. हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही कोर्टात जाऊ.

आर. पी. भटनागर, अध्यक्ष, मध्य रेल्वे कामगार संघ



हेही वाचा

सीएसएमटी मुख्यालयात आता वाहतूक वास्तुसंग्रहालय


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा