Advertisement

गोव्यात २ आठवड्यांचा राज्यव्यापी कर्फ्यू!

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने चिंताग्रस्त झालेल्या गोव्यातील सरकारने राज्यात तब्बल २ आठवड्यांचा राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला आहे. या कर्फ्यूला रविवार ९ मे पासून सुरूवात होणार आहे.

गोव्यात २ आठवड्यांचा राज्यव्यापी कर्फ्यू!
SHARES

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने चिंताग्रस्त झालेल्या गोव्यातील सरकारने राज्यात तब्बल २ आठवड्यांचा राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला आहे. या कर्फ्यूला रविवार ९ मे पासून सुरूवात होणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या शुक्रवारी या कर्फ्यूची घोषणा केली. त्यांच्या घोषणेनुसार गोव्यात ९ मे ते २३ मे या कालावधीसाठी अत्यावश्यक सेवा वगळत कुणालाही रस्त्यावर उतरण्यास मुभा नसेल. इतर सर्व सेवा सुरू राहतील.

कर्फ्यूच्या कालावधीत औषध, वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा सुरू राहणार आहे. याशिवाय घरगुती सामानांची दुकानं सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत सुरू राहतील. रेस्टॉरंट सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत टेकअवे ऑर्डर स्वीकारू शकतील.

गोव्यात कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या वाढतानाच मृत्यू दर देखील वाढत आहे. राज्यात ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा नाही. या राज्यस्तरीय कर्फ्यू संदर्भात शनिवार सायंकाळी ४ वाजता आदेश जारी केले जातील, अशी माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

हेही वाचा- राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार लसीकरण?, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत!

देशातील इतर राज्यांप्रमाणेच गोवा देखील आता कोरोनाच्या विळख्यात पुन्हा एकदा अडकू लागला आहे. या आठवड्याच्या सुरूवातीलाच राज्यात दररोज ३ हजार हून जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. राज्यातील कोरोना पाॅझिटिव्हीटी रेट ५२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. ही टक्केवारी देशात सर्वात जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. गोव्यातील डाॅक्टरांनी एक दिवस आधीच राज्यात आॅक्सिजन, बेड आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी अपुरी असल्याचं सांगितलं होतं. 

परंतु मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र राज्यात पुरेसे बेड्स असून आॅक्सिजन, रेमडेसिवीर पुरेशा प्रमाणात आहेत, असं सांगितलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रासह (maharashtra) अनेक राज्यात कडक लाॅकडाऊन लावण्यात आल्याने अनेकांनी गोव्यासारख्या राज्याचा आसरा घेतला होता. अनेकजण सुट्टी घालवण्यासाठी गोव्यात दाखल झाले होते. तर राज्यातील चित्रपट, मालिकांच्या शुटिंगसाठी देखील निर्मात्यांनी गोव्यालाच पसंती दिली होती. बाहेरच्यांमुळे गोव्यात कोरोना पसरत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.   

(curfew announced in goa from 9th may 2021)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा