Advertisement

दादरकरांचा ध्यास स्वच्छ परिसर, सुंदर परिसर


दादरकरांचा ध्यास स्वच्छ परिसर, सुंदर परिसर
SHARES

मुंबईचा दादर हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. त्यातच, शिवसेना भवनच्या जवळच असलेल्या स्वामी समर्थ मठाचा परिसर गुरुवार किंवा सणांच्या दिवशी अधिकच गर्दीमय राहतो. हा परिसर कायम सुंदर आणि स्वच्छ राहावा, यासाठी स्वामी समर्थ मठ परिसरातल्या रहिवाशांनी 19 जुलै 2015 साली मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रगत परिसर व्यवस्थापन (एएलएम) निर्माण केले आणि अवघ्या दोन वर्षांत या एएलएमच्या कार्यामुळे स्वामी समर्थ मठात येणाऱ्या भक्तांसह सर्वच रहिवाशांना स्वच्छ आणि सुंदर मुंबईचे छोटे रुप या भागात पहायला मिळत आहे.

यापूर्वी रस्त्यावर कुठेही आणि कसाही पडलेला कचरा स्वामी समर्थ मठ परिसर एएलएमच्या माध्यमातून व्यवस्थित गोळा होऊ लागला आहे. या परिसरातील 12 इमारती आणि जवळपास 350 दुकाने तसेच घरांमधून होणारा तब्बल 1 लाख किलो कचरा आता ओला आणि सुका असा वेगवेगळा होऊन पालिकेकडे जमा होतो. 76 हजार किलो ओला तर 24 हजार किलो सुका कचरा दर महिन्याकाठी वर्गीकरण झालेल्या रुपात जमा होतो, अशी माहिती एएलएमचे अधिकारी सुभाष पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

स्वामी समर्थ मठ परिसर ALM च्या माध्यमातून पालिकेच्या मदतीने स्वच्छता ठेवण्यात यश येऊ लागले असले तरी येथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अजून कायम आहे. त्यासाठी स्थानिक लोक प्रतिनिधींच्या विकास निधीतून परिसरात २१ CCTV लावण्यात आले असून यापुढेही स्वच्छता आणि सुरक्षेच्या कामांमध्ये अधिक कार्य करायचे आहे, अशी माहिती या एएलएमचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली.

थोडक्यात काय तर, लोकांनी ठरवले तर एकत्र येऊन एएलएमसारख्या संकल्पनांच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर मुंबईचा नारा नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आणि तसे उदाहरण मुंबईतील स्वामी समर्थ मठ परिसर एएलएमसारख्या काही एएलएम सोदाहरण दाखवून देत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा