Advertisement

Dahihandi 2023 : मुंबईत 107 गोविंदा जखमी

14 गोविंदांची प्रकृती चिंताजनक

Dahihandi 2023 : मुंबईत 107 गोविंदा जखमी
प्रतिकात्मक फोटो
SHARES

गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी देशभरात तसेच मुंबईत दहीहंडी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. मात्र, मुंबईत रात्री 9 वाजेपर्यंत 107 गोविंदा जखमी झाल्याचे बीएमसीने सांगितले. यातील 14 गोविंदांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर 62 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 31 गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी बीएमसीने दिली असून रात्री ९ वाजेपर्यंतची आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जखमी गोविंदांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठाण्यात 17 गोविंद जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

किती जखमींवर कोणत्या रुग्णालयात उपचार झाले

  • केईएम हॉस्पिटल: 31 जखमी (07 दाखल, 23 उपचार सुरू, 1 डिस्चार्ज)
  • लोकमान्य टिळक, सायन हॉस्पिटल: ०७ जखमी (डिस्चार्ज)
  • नायर रुग्णालय: ३ जखमी (डिस्चार्ज)
  • जेजे रुग्णालय: ३ जखमी (डिस्चार्ज)
  • हिंदुजा हॉस्पिटल- शून्य
  • सेंट जॉर्ज हॉस्पिटल: ०३ जखमी (डिस्चार्ज)
  • जीटी हॉस्पिटल: २ जखमी (ओपीडी डिस्चार्ज)
  • पोद्दार हॉस्पिटल: १६ जखमी (६ जणांवर उपचार सुरू, १० जणांना डिस्चार्ज)
  • एसएल रहेजा हॉस्पिटल: शून्य
  • बॉम्बे हॉस्पिटल: एक जखमी (उपचार सुरू)
  • राजावाडी हॉस्पिटल: 10 जखमी (2 दाखल, 8 डिस्चार्ज)
  • एमटी अग्रवाल हॉस्पिटल: 1 जखमी
  • वीर सावरकर रुग्णालय: १ (रुग्णालयात)
  • शताब्दी हॉस्पिटल: 3 जखमी (1 उपचार सुरू, 2 डिस्चार्ज)
  • वांद्रे भाभा हॉस्पिटल: 3 जखमी (1 दाखल, 2 डिस्चार्ज)
  • व्हीएन देसाई हॉस्पिटल: ४ जखमी (मुक्त)
  • कूपर हॉस्पिटल: 6 जखमी (2 दाखल, 4 डिस्चार्ज)
  • भगवती हॉस्पिटल- शून्य
  • ट्रॉमा केअर हॉस्पिटल- 4 जखमी (डिस्चार्ज)
  • BDBA हॉस्पिटल- 9 जखमी (1 दाखल, 8 डिस्चार्ज)
  • एसके पाटील हॉस्पिटल- शून्य
  • नानावटी हॉस्पिटल- शून्य

ठाण्यात 17 गोविंदा जखमी

ठाणे शहरात दहीहंडीदरम्यान झालेल्या अपघातात 17 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 11 जखमी गोविंदांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले.

तर सहा जखमी गोविंदांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. एकाही गोविंदाला गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.



हेही वाचा

टाटा पॉवर गणेश मंडळांना निवासी दरात वीजपुरवठा करणार

टाटा पॉवर गणेश मंडळांना निवासी दरात वीजपुरवठा करणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा