दहिसरच्या भरुचा रोडची दुर्दशा

 Dahisar
दहिसरच्या भरुचा रोडची दुर्दशा
दहिसरच्या भरुचा रोडची दुर्दशा
See all

दहिसर - दहिसर पूर्व एस व्ही रोड ते रेल्वे स्टेशनला जाणारा भरुचा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तर दुसरीकडे रोडवर कचरा आणि रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरले आहे. तसेच बाटला मंदिर येथे असलेली कचरा पेटी भरली असल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा फेकतात. कचरा रस्त्यावर फेकत असल्याने रोगराईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी ही करण्यात आलेली नाही. रस्त्याची झालेली चाळण आणि पसरलेला कचरा याविषयी वारंवार तक्रार करुनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Loading Comments