Advertisement

“मुंबईचे रस्ते ‘सुपर क्लीन’”, डेल स्टेनच्या कौतुकानंतर मुंबईकरांनी केली पोलखोल

पण मुंबईकरांनी अनेक कमेंट आणि फोटोंसहीत खरी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

“मुंबईचे रस्ते ‘सुपर क्लीन’”, डेल स्टेनच्या कौतुकानंतर मुंबईकरांनी केली पोलखोल
SHARES

दक्षिण आफ्रिकेचा माजी जलदगती गोलंदाज डेल स्टेन(Dale Steyn)नं मुंबई(Mumbai)मधील रस्त्यांना ‘सुपर क्लीन’ (super clean) असं म्हटलं आहे. हे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी आणि त्यावर कचरा नसावा म्हणून फार प्रयत्न केले जात असल्याचंही स्टेननं ट्विटवरुन म्हटलं आहे.

विशेष म्हणजे या ट्विटला मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन रिप्लाय करण्यात आलाय. आम्ही स्वच्छ रस्ते आणि मोकळ्या मनाने सर्वांच्या स्वागतासाठी तयार असल्याचं पालिकेनं म्हटलंय.

“मुंबईमधील रस्ते सुपर क्लीन आहेत असं मी म्हटलं पाहिजे. रस्त्यावर कचरा दिसून नये म्हणून फार मेहनत घेतली जात असल्याचं मला इथं दिसत आहे. फारच छान,” असं स्टेटननं ट्विट केलं आहे.

“तुमच्या या चांगल्या कौतुकासाठी आम्ही आभार मानतो. आम्ही नेहमीच इथे स्वच्छ रस्ते आणि मोठ्या मनाने लोकांचं स्वागत करतो. आम्हाला आमच्या स्वच्छता योद्ध्यांच्या आणि मुंबईकरांच्या मदतीने मुंबई स्वच्छ आणि हरित ठेवण्यास मदत होते,” असं पालिकेनं म्हटलं आहे.

पण मुंबईकरांनी अनेक कमेंट आणि फोटोंसहीत ठिकठिकाणी असलेल्या कचऱ्याचे ढीग स्टेनला दाखवले आहेत.

स्टेन सध्या आयपीएलनिमित्त भारत दौऱ्यावर असून सर्व सामने मुंबई आणि पुण्यात खेळवण्यात येत असल्याने सर्व समालोचक आणि प्रशिक्षक तसेच संघ मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत.


हेही वाचा

आता शिवाजी पार्क देखभालीची कंत्राटदारावर जबाबदारी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा