Advertisement

दादर चौपाटीवर सापडला मृत डॉल्फीन


SHARES

खवळवलेला समुद्र सध्या मुंबईच्या चौपट्यांवर दररोज लाखो टन कचरा आणून टाकतोय. या कचऱ्यासोबतच सोमवारी दादरच्या चौपाटीवर एक मृत डॉल्फीन वाहून आला. अंदाजे ४ ते ५ फूट लांबीचा हा डॉल्फीन चौपाटीची स्वच्छता करणाऱ्या सदस्यांच्या हाती लागला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी स्वयंसेवक जय श्रृंगारपुरे याच्या पुढाकाराने माहीम आणि दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 'स्वच्छ, हरित शिवाजी पार्क अभियान एएलएम'चे सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान या चौपाट्यांची स्वच्छता केली.



ही स्वच्छता मोहीम सुरू असताना हा मृत डॉल्फीन सदस्यांच्या हाती लागला. अंदाजे ४ ते ५ फूट लांबीचा हा मृत डॉल्फीन वयाने लहान असल्याचे जाणकारांनी सांगितले. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर मृत मासे येऊन पडण्याची बाब नवी नाही. त्याचप्रमाणे हा डॉल्फीन वाहून दादर चौपाटीवर आला. या डॉल्फीनच्या डोक्यावर मार लागल्याचे निशाण दिसत असून एखाद्या अवजड वस्तूला डोके आदळून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.



हे देखील वाचा -

चौपाटी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आमचीही



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा