चौपाटी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आमचीही

MAHIM
चौपाटी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आमचीही
चौपाटी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आमचीही
चौपाटी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आमचीही
See all
मुंबई  -  

दादर आणि माहीम चौपाटीवर फिरायला येणाऱ्यांची गर्दी जसजशी वाढत आहे. तसतशी या चौपाट्यांवरील अस्वच्छतेतही भर पडत आहे. अस्वच्छता म्हटले की नाकावर रूमाल धरून पुढे जाणे आलेच. पण काही स्थानिक कार्यकर्ते पुढाकार घेऊन चौपाटीची साफसफाई करून इतरांपुढे आदर्श ठेवत आहेत.

स्थानिक रहिवासी जय श्रृगांरपुरे (३४) हे यापैकीच एक. श्रृगांरपुरे यांनी सोशल मीडियाची मदत घेऊन स्थानिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यशही मिळत असल्याचे दिसत आहे.रविवारी त्यांनी आयोजित केलेल्या माहीम चौपाटीच्या स्वच्छता मोहिमेत तब्बल ५० स्थानिकांनी सहभाग घेतला. यामध्ये लहान मुलांपासून प्रौढ पुरूष आणि महिलांचा समावेश होता. सर्वांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन १० टन कचरा गोळा करत चौपाटीला चकाचक केले.

या मोहिमेसंदर्भात जय श्रृंगारपुरे म्हणाले की, आम्हाला महापालिकेवर भरवसा नाही. महापालिकेकडे तक्रार करत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या परिसरात स्वच्छता ठेवली पाहिजे.

ते पुढे म्हणाले, दादर चौपाटीवर जिकडे तिकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याला जबाबदार स्वत: मुंबईकर आहेत. आजारी पडू नये म्हणून आपण जसे आपले घर स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे आपण आपला परिसरही स्वच्छ केला पाहिजे.माहीम बीच कमिटीचे सदस्य आणि माहीम दर्गा एएलएमचे अध्यक्ष अन्वर खान म्हणाले की, समुद्राला भरती आल्यास चौपाटीवर पुन्हा कचरा जमा होतो. नाल्याचा कचराही चौपाटीवर येतो. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी कायमचा उपाय योजण्याची गरज आहे.

महापालिकेच्या जी/नॉर्थचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांच्या मते, महापालिकेकडून १ ऑगस्टपासून कचरामुक्तीसाठी अभियान राबविण्यात येत आहे. रहिवाशांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घेण्याची गरज आहे.हे देखील वाचा -

कचऱ्याची विल्हेवाट लावा, नाहीतर गुन्हा दाखल होईल!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.