कचराऱ्याची विल्हेवाट लावा, नाहीतर गुन्हा दाखल होईल!

 Mumbai
कचराऱ्याची विल्हेवाट लावा, नाहीतर गुन्हा दाखल होईल!

मुंबईकरांनो..जर कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही आणि तो कुठेही फेकत असाल तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. तसा इशाराच मुंबई महापालिकेने दिला आहे.

पालिकेच्या माध्यमातून स्वच्छ आणि हरित मुंबई ही मोहीम राबवण्यासाठी कार्यरत असलेल्या अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट (एएलएम) सोबत जी उत्तरचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत ते म्हणाले, यापूर्वी कचरा कुठेही फेकल्यास ती चूक मानली जायची. पण आता असे होणार नाही. यंदा गांधी जयंतीच्या दिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2017 पासून जर कुणी कचऱ्याची विल्हेवाट लावत नसेल, तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होईल.

यामध्ये दादर, माहीम आणि धारावीतील एएलएमचे सदस्य आणि तिथले काही स्थानिक या बैठकीसाठी उपस्थित होते. आपल्या घरातील आणि परिसरातील गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येऊ शकते? आणि सांडपण्याचा पुनर्वापर कसा होऊ शकतो? यासाठी 'ग्रीन वर्ल्ड' या एनजीओद्वारे प्रेझेंटेशन देण्यात आले. यावेळी न्यूयॉर्क आणि इस्त्रायलचे मॉडेल लोकांसमोर ठेवण्यात आले.

मुंबईची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी कचऱ्याचा ढीग आणि अस्वच्छता पसरलेली आहे. त्यामुळे पालिकेकडून फक्त नियम करून चालणार नाही. त्यावर योग्य ते उपाय केलेच पाहिजेत, असे काही एएलएमच्या सदस्यांचे म्हणणे होते.

जी नॉर्थ सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष अन्वर खान म्हणाले, 'नियम हे फक्त सोसायट्यांवरच लागू करून चालणार नाहीत. झोपडपट्ट्यांवरही ते नियम लागू व्हायला हवेत. आज माहीम परिसरात सर्वात जास्त कचरा झोपडपट्टीतून गोळा होतो. त्याची विल्हेवाटही लावली जात नाही. त्यामुळे तो कचरा मिठी नदीच्या किनारी साठला आहे. त्याने संपूर्ण परिसर दूषित झाला आहे. यावर तोडगा काढायला हवा.हेही वाचा -

मुख्यमंत्री माहीमकरांना न्याय देणार का?

यामुळेच दादरची 'सिल्व्हर बीच सोसायटी' कचरामुक्त


Loading Comments