Advertisement

यामुळेच दादरची 'सिल्व्हर बीच सोसायटी' कचरामुक्त


यामुळेच दादरची 'सिल्व्हर बीच सोसायटी' कचरामुक्त
SHARES

मुंबईच्या दादर चौपाटीजवळची सिल्व्हर बीच सोसायटीमधील रहिवाशांनी एकत्र येऊन कचरामुक्त सोसायटी बनवली आहे. ज्यात ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी सोसायटीद्वारे एक सफाईकामगार नेमण्यात आला आहे. त्यामुळे आज ही सोसायटी चकाचक झाली असल्याची प्रतिक्रिया तिथल्या रहिवाशांनी दिली. या सोसायटीत एकूण 37 फ्लॅट्स आहेत. ज्यात जवळपास 200 कुटुंब राहतात. या सोसायटीतून दरदिवसाला 18 ते 20 किलो कचरा गोळा केला जातो. ज्यात 15 ते 18 किलो सुकाकचरा असतो. तर ओल्या कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट लावून कॉम्पोस्टिंग पिटच्या मध्यमातून खत बनवली जाते. त्याचा वापर सोसायटीतील बागेतल्या फुलझांडांसाठी केला जातो. पण हे सर्व खऱ्या अर्थाने शक्य झाले ते फक्त स्वछ हरित शिवाजी पार्क एएलएममुळे, असे तिथले स्थानिक सांगतात.


पण गेल्या कित्येक वर्षांपासून हरित शिवाजी पार्क एएलएमच्या सदस्या असलेल्या तस्नीम शुल्क हे त्यांच्या घरातील कचऱ्यापासून खत बनवत असत. त्याची चाहूल सिल्व्हर बीच सोसायटीच्या इतर रहिवाशांना लागली. त्यानंतर स्थानिकांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आणि हा प्रयोग सुरू करत आपली सोसायटी कचरामुक्त केली.


आज कचरामुक्त सोसायटी ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. ज्यामुळे संपूर्ण शहर कचरामुक्त होण्यास मदत होईल. दादरचा समुद्र किनारा कचऱ्याच्या विळख्यात आहे. त्याचे कारण म्हणजे मिठी नदीतून येणारा कचरा. पण खरे पाहिले तर हा नागरिकांनीच केलेला कचरा असतो. तो दादर-माहीमच्या किनारपट्टीवर येतो. त्याचा त्रास हा आपल्यालाच होणार आहे. याची जाणीव त्या नागरीकांना व्हायला हवी. त्यामुळे नारिकांनी पुढाकार घेऊन कचरामुक्त शहर बनवले पाहिजे.
- सोनाली चितळे, रहिवासी



कम्पोस्टिंग पिटच्या मध्यमातून खत बनवले. त्याचा वापर सोसायटीतील बागेतल्या झाडांसाठी केला. त्यामुळे आमची सोसायटी जरी समुद्रकिनारी असली, तरी त्या बागेतील झाडे सुंदर आणि निरोगी राहतात.
- निर्मला मुंढर, रहिवासी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा