माहिममध्ये हरवला फूटपाथ

MAHIM
माहिममध्ये हरवला फूटपाथ
माहिममध्ये हरवला फूटपाथ
माहिममध्ये हरवला फूटपाथ
माहिममध्ये हरवला फूटपाथ
See all
मुंबई  -  

मुंबईच्या माहिम विभागातील कॅडेल रोड म्हणजेच वीर सावरकर मार्गावरील फूटपाथची अत्यंत दूरवस्था झाली आहे. नागरिकांना चालण्यासाठी असलेल्या फूटपाथवर पार्किंग, अनधिकृत झोपड्या बांधल्या असून येथे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. फूटपाथचे पेव्हर ब्लॉकदेखील निखळले आहेत. त्यामुळे, येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


विशेष म्हणजे, स्थानिकांच्या समस्यांवर पूर्ण विराम लागावा, यासाठी हा विभाग 2014 साली पालिकेच्या `स्वच्छ मुंबई हरित मुंबई` संकल्पना असलेल्या अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटशी (एएलएम) जोडला गेला.2014 मध्ये एएलएमशी जोडले गेल्यानंतर या विभागाचे नाव कॅडेल रोड नॉर्थ एएलएम असे ठेवण्यात आले. ज्यामध्ये 72 इमारतींचा समावेश आहे. या इमारतीत जवळपास 1200 रहिवासी आहेत. 


या विभागातील स्थानिक नागरीकांच्या समस्या नेहमी चर्चा करून सोडवल्या जातात. त्यावर मार्ग देखील काढला जातो. पण आज कॅडेल रोडवरील फूटपाथ हरवल्यात जमा आहे. पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.
कयूम पटेल, अध्यक्ष, कॅडेल रोड नॉर्थ एएलएम

यावर मुंबई लाइव्हने पालिकेच्या एएलएम अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात विचारणा केली असता 'लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल' असे ते म्हणाले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.