Advertisement

अनधिकृत झोपड्यांवर कारवाईस सुरुवात


SHARES

वांद्रे - बेहरामपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पालिका प्रशासनाने शनिवारपासून कारवाई करण्यास सुरुवात केली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू झाली आहे.
येथील झोपड्यांची एकंदर परिस्थिती पाहता अत्यंत काळजीपूर्वक काम करावं लागतंय. त्यामुळे शनिवारी फक्त ४ घरांचे तीन ते चार मजले पाडणं शक्य झालं. मात्र कारवाईबाबत स्थानिकांत साहजिकच नाराजी आहे. कारवाईला विरोध होईल म्हणून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पण तसा विरोध झाला नाही. ही कारवाई सोमवारीही सुरू राहील, असं सांगण्यात येतंय. गरीबनगर आणि प्रभात कॉलनीतही कारवाई होईल, असं एच इस्टचे महापालिका सहाय्यक आयुक्त पी. एन. गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. मात्र, कारवाई होती की मध्येच थांबते हाच चर्चेचा विषय ठरलाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा