अनधिकृत बांधकामं सुरूच

 Chembur
अनधिकृत बांधकामं सुरूच

चेंबूर - वांद्र्यातील बेहरामपाडा आणि घाटकोपरमधील अनधिकृत बांधकाम केलेल्या तीन आणि चार मजली इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना, चेंबूरच्या इंदिरानगरमधील वाशीनाका येथे रस्त्याच्या बाजूला पुन्हा अनधिकृतपणे दुकानांचं बांधकाम करण्यात आलंय. इतकंच नाही तर ती दुकानं भाड्याने चालवण्यास दिली जात आहेत. याबद्दल उपजिल्हाधीकारी प्रमोद साळवे यांना विचारले असता 'अनधिकृत बांधकाम तोडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असून येत्या काही दिवसातच कारवाई करणार' असल्याचं ते म्हणाले.

Loading Comments