बेकायदा इमारतीवर हातोडा

 Masjid Bandar
बेकायदा इमारतीवर हातोडा

डोंगरी - डिलिमा स्ट्रीटवरच्या राबियाबाई बिल्डिंग या आठ मजली बेकायदा इमारतीवरील कारवाईला शुक्रवारपासून सुरुवात झाली. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येतेय. ही इमारत अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाची असल्याचं बोललं जातं. महापालिकेनं काही महिन्यांपासून अतिक्रमणांविरोधी मोहीम सुरू केलीय. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागानं ही कारवाई केलीय. तिचा स्लॅब तोडण्यास सुरुवात झालीय. मनुष्यबळाच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्यानं कारवाई केली जाईल, अशी माहिती बीएमसी सुत्रांकडून मिळालीय.

Loading Comments