Advertisement

कल्याणच्या पत्री पुलाच्या पाडकामाला सुरुवात

20 जुलै रोजी कल्याण येथील 104 वर्ष जुना असलेल्या पत्री पुलाचं आयआयटी मुंबई, केडीएमसी आणि रेल्वेने स्ट्रकरल ऑडिट केलं होतं. त्यावेळी पत्री पूल धोकादायक असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता. आता या पुलाचं पाडकाम सुरु करण्यात आलं आहे.

कल्याणच्या पत्री पुलाच्या पाडकामाला सुरुवात
SHARES

वाहतुकीसाठी अतिधोकादायक असलेल्या कल्याणच्या जुन्या पत्री पुलाच्या पाडकामाला सुरूवात करण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद होता. याठिकाणी नव्या पुलाचं बांधकाम सुरू होणार असून, त्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

धोकादाय पूल पाडणार

20 जुलै रोजी कल्याण येथील 104 वर्ष जुना असलेल्या पत्री पुलाचं आयआयटी मुंबई, केडीएमसी आणि रेल्वेने स्ट्रकरल ऑडिट केलं होतं. त्यावेळी पत्री पूल धोकादायक असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता. आता या पुलाचं पाडकाम सुरु करण्यात आलं आहे. 

अखेर पाडकामाला सुरुवात

24 ऑगस्टपासूनच या पुलाचं पाडकाम सुरू होणार होतं. मात्र आधीच मुंब्रा बायपास या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यामुळे शिळफाटा-कल्याण-भिवंडी या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढला होता. या कारणाने पत्री पुलाचं पाडकाम थांबवण्यात आलं होतं. आता मुंब्रा बायपास या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याने मंगळवारी पत्री पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा