Advertisement

१०२ वर्षे जुना पत्रीपुल इतिहासजमा, पुलाच्या पाडकामाला सुरूवात

कल्याणचा पत्रीपुल अत्यंत धोकादायक झाल्यानं हा पुल पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला. त्यानुसार रविवारी सकाळपासून या पुलाच्या पाडकामाला सुरूवात करण्यात आली आहे. स

१०२ वर्षे जुना पत्रीपुल इतिहासजमा, पुलाच्या पाडकामाला सुरूवात
SHARES

कल्याणमधील मध्य रेल्वेवरील तब्बल १०२ वर्षे जुन्या-ब्रिटीशकालीन पत्रीपुलाच्या पाडकामाला रविवारी सकाळपासून मध्य रेल्वेकडून सुरूवात करण्यात आली आहे. धोकादायक झाल्यानं हा पूल पाडण्यात येत असून या पाडकामासाठी रविवारी मध्य रेल्वेनं तब्बल सहा तासांचा जम्बो ब्लाॅक घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे तर अनेक गाड्याही रद्द झाल्या आहेत. सकाळी नऊच्या दरम्यान पाडकामाला सुरूवात झाली असून दुपारी चारपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.


एक्सप्रेस गाड्या रद्द

कल्याणचा पत्रीपुल अत्यंत धोकादायक झाल्यानं हा पुल पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला. त्यानुसार रविवारी सकाळपासून या पुलाच्या पाडकामाला सुरूवात करण्यात आली आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० दरम्यान या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर सहा तासांचा जम्बो ब्लाॅक घेतला आहे. त्यामुळं कल्याण ते डोंबिवलीदरम्यान वाहतुक पूर्णत यावेळेत ठप्प असणार आहे, यावेळेत या मार्गावर एकही लोकल धावणार नाही. तर अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करत काही गाड्यांच्या मार्गात बदलही केला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील इतर वाहतुक व्यवस्थेवर मोठा ताण पडणार आहे. गरज असल्यास प्रवाशांनी लोकलनं प्रवास करावा असं आवाहन रेल्वेेकडून करण्यात आलं आहे.


अद्ययावत यंत्रसामग्री 

७० अधिकारी, ४५० कर्मचारी यांच्या माध्यमातून हे पाडकाम करण्यात येत आहे. तर पाडकामासाठी भल्या मोठ्या क्रेन आणि इतर अद्ययावत यंत्रसामग्री दोन दिवसांपूर्वीच आणण्यात आली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत पाडकाम पूर्ण होईल आणि त्यानंतर जुना ब्रिटीशकालीन पुल इतिहासजमा होईल.



हेही वाचा - 

मध्य रेल्वेवर रविवारी विशेष जम्बो ब्लाॅक, 'या' गाड्या होणार रद्द

'अल कायदा’चं लक्ष्य मुंबईवर, गुप्तचर खात्याचा हाय अलर्ट!




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा