Advertisement

मध्य रेल्वेवर रविवारी विशेष जम्बो ब्लाॅक, 'या' गाड्या होणार रद्द

कल्याण स्थानकापुढील प्रवाशांच्या सुविधेसाठी कल्याण ते कर्जत-कसारा आणि सीएसएमटी ते डोंबिवलीपर्यंत विशेष लोकल तसेच एसटी सेवा चालविण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेवर रविवारी विशेष जम्बो ब्लाॅक, 'या' गाड्या होणार रद्द
SHARES

कल्याणमधील १०० वर्षे जुना पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी जम्बोब्लॉक घेण्यात येत आहे. या पुलाचं पाडकाम सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० असं ६ तास चालणार आहे. परिणामी या काळात कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच मध्य रेल्वेने काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत, काहींच्या गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे, तर काही गाड्यांच्या वेळात्रकात बदल केला आहे.

कल्याण स्थानकापुढील प्रवाशांच्या सुविधेसाठी कल्याण ते कर्जत-कसारा आणि सीएसएमटी ते डोंबिवलीपर्यंत विशेष लोकल तसेच एसटी सेवा चालविण्यात येणार आहेत.

लांब पल्ल्याचा रद्द झालेल्या गाड्या:

  • १२११८/१२११७ मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस
  • १२११०/१२१०९ मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस
  • १९ तारखेला ५११५३ मुंबई-भुसावळ पॅसेंजर
  • ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर
  • २२१०१/२२१०२ मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
  • ११०१०/११००९ पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
  • १२१२४/१२१२३ पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
  • १२०७२/१२०७१ जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस


ट्रेनच्या मार्गात बदल आणि दिवा स्थानकात थांबा:

काकीनाडा पोर्ट-एलटीटी एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, हैद्राबाद-मुंबई एक्स्प्रेस, चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस, कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे जाणार असून या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.

एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस, मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस, मुंबई-हैद्राबाद एक्स्प्रेस या गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्गे चालवल्या जाणार असून त्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.

हावडा-मुंबई मेल व्हाया चौकी, राजेंद्रनगर-एलटीटी एक्स्प्रेस, वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस या गाड्या दिवा-वसई-जळगाव मार्गे चालवल्या जाणार असून या गाड्यांना भिवंडी, दिवा स्थानकात थांबा दिला जाणार आहे.


ट्रेनच्या वेळेत बदल:

सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस, एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस, एलटीटी-वाराणसी कामयानी एक्स्प्रेस, एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस, सीएसएमटी-गोरखपूर विशेष गाडी, सीएसएमटी-हावडा मेल व्हाया चौकी, सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, एलटीटी-वाराणसी एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळेत बदल केला जाणार आहे.

कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच चालवण्यात येणार आहे. तसंच, ही गाडी पुण्यातूनच कोल्हापूरसाठी रवाना होणार आहे.

नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकपर्यंतच चालवण्यात येणार आहे. तिथूनच परतीच्या मार्गावर ती नागपूरसाठी रवाना होणार आहे.हेही वाचा-

बसगाड्या भाडेतत्वावर घेण्याला बेस्टमधील कामगार संघटनांचा विरोध

बुडत्या मोनोला जाहिरातींचा आधार!Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा