Advertisement

बुडत्या मोनोला जाहिरातींचा आधार!

देशातील पहिली मोनो रेल अशी ओळख असलेली वडाळा-चेंबूर मोनो मार्ग 'एमएमआरडीए'साठी पांढरा हत्ती ठरला आहे. कारण मोनोचा देखभाल खर्च आणि उत्पन्न यात कमालीचा फरक असून 'एमएमआरडीए'ला दिवसाला अंदाजे ६ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.

बुडत्या मोनोला जाहिरातींचा आधार!
SHARES

आर्थिक तोट्यात असलेल्या या मोनोरेल प्रकल्पाला आर्थिक खााईतून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने उत्पन्नाचा नवा उपाय शोधला आहे. तो म्हणजे जाहिरातींचा. मोनोरेल स्थानक, मोनो गाड्या मोनोचे खांब अशा ठिकाणी खासगी कंपन्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करत त्यातून उत्पन्न मिळवण्याचा हा निर्णय असल्याची माहिती 'एमएमआरडीए'तील सूत्रांनी दिली आहे.

देशातील पहिली मोनो रेल अशी ओळख असलेली वडाळा-चेंबूर मोनो मार्ग 'एमएमआरडीए'साठी पांढरा हत्ती ठरला आहे. कारण मोनोचा देखभाल खर्च आणि उत्पन्न यात कमालीचा फरक असून 'एमएमआरडीए'ला दिवसाला अंदाजे ६ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.


सुरूवातीपासूनच तोट्यात

प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने चेंबूर ते वडाळा मोनोरेल प्रकल्प सेवेत दाखल झाल्यापासूनच तोट्यात आहे. त्यातच मोनोचा देखभाल खर्चही आवाढव्य आहे. हे कमी की काय? ११ महिन्यांपूर्वी मोनोच्या डब्याला आग लागल्याने तब्बल ९ महिने मोनो सेवा ठप्प होती. त्यामुळे मोनोला मोठा आर्थिक फटका बसला.


देखभाल शुल्कात वाढ

९ महिन्यांनंतर मोनो पुन्हा ट्रॅकवर आली. पण त्यावेळी मोनोचं व्यवस्थापन आणि देखभाल करणाऱ्या एल अॅण्ड टी-स्कोमी कंपनीने व्यवस्थापन-देखभाल शुल्कात वाढ मागितली. त्यानुसार ४६०० रुपयांवरून १०६०० रुपये इतकं शुल्क वाढवून देण्यात आलं. परिणामी 'एमएमआरडीए'चा आर्थिक भार आणखी वाढला.


कुठे लावता येईल जाहिरात?

या सर्व पार्श्वभूमीवर मोनोला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मेट्रो-१ च्या धर्तीवर 'एमएमआरडीए'नं जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याचा निर्णय घेतला. मोनो गाड्यांपासून मोनो स्थानकापर्यंत तर मोनोच्या खांबांपासून मोनो स्थानकाबाहेरच्या परिसरापर्यंत सर्वत्र खासगी कंपन्यांना जाहिराती लावण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यातून मोनोला जे काही उत्पन्न मिळेल त्यातून आर्थिक तूट भरून काढण्यात येणार आहे. तेव्हा बुडत्या मोनोला जाहिरातींचा किती आणि कसा उपयोग होतो, हे येत्या काळातच समजेल.



हेही वाचा-

अरेरे! मोनोचे प्रवासी ५ हजारांनी घटले!!

वारंवार मोनो का बंद पडते? एमएमआरडीए करणार चौकशी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा