मानखुर्दमध्ये नाल्यांची सफाई अर्धवटच

 Mankhurd
मानखुर्दमध्ये नाल्यांची सफाई अर्धवटच
Mankhurd, Mumbai  -  

एकीकडे मुंबई महानगर पालिका शहरातील नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करत आहे. मात्र दुसरीकडे काही ठिकाणी नालेसफाई झालीच नसल्याचे समोर आले आहे. मानखुर्द परिसरातील मंडाळा नाला अद्यापही पालिकेने साफच केला नसल्याचे समोर आले आहे. या नाल्यात मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. ज्यामुळे येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या नाल्यालगतच मंडाळा झोपडपट्टी आणि मंडाळा भंगार मार्केट आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाला तुंबल्यास या परिसराला मोठा फटका बसणार आहे. मानखुर्दच्या साठेनगर परिसरातून हा नाला निघून पुढे तो वाशी खाडीला मिळतो. त्यामुळे पालिकेने केवळ साठेनगर पर्यंतच सफाई केलेली आहे.

दरम्यान, पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पालिकेने आता तरी या भरलेल्या नाल्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी जितेंद्र यादव यांनी केली आहे. तर याबाबत पालिकेचे एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Loading Comments