मरिन लाइन्स - मरिन लाइन्स स्थानकाच्या बाहेरील फुटपाथवर बेघरांनी आपला संसार थाटलाय. हे बेघर दिवसा आपला उदरनिर्वाह भीक मागून करतात आणि रात्री या फुटपाथवरच झोपतात. त्यामुळे इथून जा-ये करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. पालिकेनं या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. याबाबत सी विभागातील ऑफिसर जीवक घेगडमल यांना विचारलं असता, लवकरात लवकर कारवाई करू असं आश्सासन देण्यात त्यांच्याकडून देण्यात आलं