Advertisement

'बलून' तंत्रज्ञानानं घेतला जाणार वायूगळतीचा शोध

दूषित भागातील हवा विशिष्ट फुग्यात भरून त्याची तपासणी केली जाणार आहे.

'बलून' तंत्रज्ञानानं घेतला जाणार वायूगळतीचा शोध
SHARES

मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये अनेकदा वायुगळती होत असते.  या वायुगळतीमुळं या परिसरातील स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. मागील काही वर्षभरात अशा वायुगळतीच्या व विचित्र दुर्गंध पसरण्याचा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळं या घटनांवर आळा घालून स्थानिकांना दुर्गंधीच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी अग्निशमन दलानं नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे.

दूषित भागातील हवा विशिष्ट फुग्यात भरून त्याची तपासणी केली जाणार आहे. ज्या भागात अशी दुर्गंधी येत असेल, तेथील दूषित हवा विशिष्ट यंत्राच्या साहाय्याने एका खास फुग्यात भरली जाते. या फुग्यातील हवेचे नंतर परीक्षण करून त्यात कोणत्या वायूचे किती प्रमाण आहे, कोणत्या वायूचे प्रमाण वाढले आहे का हे तपासून पाहता येते. हे तंत्रज्ञान लवकरच अग्निशमन दलात समाविष्ट करण्यात येणार आहे.

पूर्व उपनगरांतील सर्व रासायनिक कंपन्यांनाही हे तंत्रज्ञान घेण्याच्या सूचना पालिकेतर्फे दिल्या जाणार आहेत. पूर्व उपनगरांत बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ अशा अनेक रासायनिक कंपन्या आहेत. तसेच महानगर गॅस लिमिटेडच्या गॅसवाहिन्यांचेही जाळे मुंबईभर आहे. त्यामुळे व्यापक परिसरात दुर्गंधी येऊ लागली की साहजिकच कंपन्यांमधून वायुगळती होते की काय, अशी भीती निर्माण होते. त्यामुळे गेल्या वर्षी पालिकेने मुंबईतील अशा रासायनिक कंपन्यांच्या प्रतिनिधींची व वायू प्रदूषणावर काम करणाऱ्या संस्था आणि मुंबई महापालिका, अग्निशमन दल अशा १६ विविध प्राधिकरणांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीची लवकरच बैठक घेऊन निश्चित कार्यपद्धती ठरवण्यात येणार असल्याची माहिती मिळते. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा