Advertisement

दत्ता पडसलगीकरांना ‘डीजीपी’साठी ३ महिन्यांची मुदतवाढ


दत्ता पडसलगीकरांना ‘डीजीपी’साठी ३ महिन्यांची मुदतवाढ
SHARES

राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना ‘डीजीपी’ पदासाठी मुदतवाढ मिळणार आता हे निश्चित झालं आहे. कारण ३० नोव्हेंबर २०१८ शुक्रवारी मुदतवाढीचा कालावधी संपत होता. मात्र गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी ३ महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.


पुन्हा मुदतवाढ

मिळालेल्या माहितीनुसार, पडसलगीकर ३१ ऑगस्ट आणि त्यानंतर आता मुदतवाढ संपल्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार होते. त्यामुळे पोलिस महासंचालकपदाची धुरा सध्याचे मुंबई पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल सांभाळणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने जैस्वाल यांना मुंबई आयुक्तपदी कायम ठेवत दत्ता पडसलगीकर यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली.


राज्य आणि केंद्राकडून मुदतवाढ

आधी राज्याकडून आणि नंतर केंद्राकडून तीन महिन्यांती मुदतवाढ पडसलगीकर यांना देण्यात यावी यासाठी आयपीएस लॉबीमध्ये आधीपासून प्रयत्न सुरू होते. शिवाय याबाबतचा प्रस्तावही केंद्राकडे पाठवण्यात आला. आता याबाबतचे आदेश शुक्रवारी जारी होईल, असं सूत्रांकडून समजतं. त्यामुळे पडसलगीकर यांना निवृत्तीनंतर दोन टप्प्यात सहा महिने मुदतवाढ मिळणार आहे. गेल्या दहा वर्षांत एस.एस.विर्क आणि अजित पारसनीस यांनाच अशा प्रकारची मुदतवाढ मिळाली होती.


म्हणून मुदतवाढ दिली

दत्ता पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते एक जुलैपासून राज्याच्या पोलिस प्रमुखपदाची धुरा सांभाळत आहेत. यापूर्वी पडसलगीकर सव्वा दोन वर्षे मुंबईच्या आयुक्तपदी आणि केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. निवृत्तीची अवधी जवळ आल्यामुळे त्यांना ‘डीजीपी’पदावर केवळ दोन महिन्यांचा कालावधी मिळत होता. त्यामुळे राज्य सरकारकडून त्यांना ३१ आॅगस्टला पहिल्यांदा तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा