Advertisement

लोकसहभागातून पादचारी पुलाची दुरूस्ती


लोकसहभागातून पादचारी पुलाची दुरूस्ती
SHARES

धारावी - जे काम स्थानिक नगरसेवक किंवा आमदाराने केलं पाहिजे ते काम चक्क धारावीच्या रहिवाशांनी करून दाखवलं आहे. रहिवाशांनी चक्क वर्गणी गोऴा करत धारावी धोबीघाट सरकारी पादचारी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची सुरुवात केलीय. धारावी धोबीघाट पादचारी पुलावर रोज होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले होते. वारंवार तक्रारी करूनही रेल्वे, पालिका तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत होते. मात्र स्थानिक समाजसेवक एन.आर. पॉल यांनी लक्ष घालून लोकसहभागातून या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासनाच्या दुटप्पी धोरणामुळे या पादचारी पुलाचे काम रखडले होते. चार महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने पुलाच्या पूर्वेकडील (शीव) भागातील जिन्याचे काम करून त्या भागाचे शुशोभीकरण केले होते. मात्र धारावीकडील पश्चिमेच्या भागाकडे ढुंकूनही पहिले नसल्याचा संताप येथील स्थनिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा