वडाळ्यातील वाहतूक समस्या : शिवमुद्राचं आमदारांना साकडं

 wadala
वडाळ्यातील वाहतूक समस्या : शिवमुद्राचं आमदारांना साकडं
वडाळ्यातील वाहतूक समस्या : शिवमुद्राचं आमदारांना साकडं
See all

वडाळा - बरकत अली नाका ते गणेशनगर या मार्गावर वाहतुकीमुळे होणारे अपघात टळावे आणि बेशिस्त वाहनचालकांना चाप बसावा, या मागणीसाठी वडाळ्यातील शिवमुद्रा युवा प्रतिष्ठाननं स्वाक्षरी मोहीम आणि मूक मोर्चा काढला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनंही दिली आहेत. मात्र न्याय मिळत नसल्यानं अखेर स्थानिक आमदार तमिळ सेल्वन यांना साकडं घालण्यात आलंय.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पानसे, सचिव प्रशांत मोरे, उपाध्यक्ष जितेश गोळे आदींनी सेल्वन यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे हा विषय मांडला. प्रतिष्ठानानं मांडलेल्या समस्येची त्वरित दखल घेऊन पाठपुरावा करण्यात येईल आणि वाहतुकीची समस्या नियंत्रणात येण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येईल. त्यासाठी महापालिकेला आवश्यक सूचना देण्यात येतील, असं सेल्वन यांनी सांगितल्याची माहिती सचिव मोरे यांनी दिली.

Loading Comments