Advertisement

धवल कुलकर्णी म्हणतो, महापालिका शाळांमधील मुलांना क्रिकेट शिकवायला आवडेल!


धवल कुलकर्णी म्हणतो, महापालिका शाळांमधील मुलांना क्रिकेट शिकवायला आवडेल!
SHARES

मराठी भाषा गौरवदिनाचं औचित्य साधून मराठी चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह भारतीय क्रिकेटपटू धवल कुलकर्णी याचाही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी धवल कुलकर्णी यांने आपल्याला महापालिकेच्या शाळांमधील मुलांना क्रिकटचे प्रशिक्षण द्यायला आवडेल, अशी भावना व्यक्त केली.


धवल कुलकर्णीचा सत्कार

भारतीय क्रिकेटपटू मुंबई रणजी संघाचा आघाडीचा गोलंदाज असलेल्या धवल कुलकर्णी याची ‘इट इज महाराष्ट्र अॅचिवर्स’ या पुरस्कारासाठी सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे. या पुरस्कारानिमित्त तसेच मराठी गौरवदिनाचे औचित्य साधून धवल कुलकर्णी यांचा महापौर दालनात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत मराठी अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उद्यान आणि बाजार समिती अध्यक्षा सान्वी तांडेल आणि माजी नगरसेवक विजय तांडेल यांच्या पुढकाराने धवल कुलकर्णी यांना महापालिकेतर्फे सन्मानित करण्यात आले.


काय म्हणाला धवल कुलकर्णी?

मुंबई महापालिकेतील शाळांमधील मुलांना क्रिकेट धडे देण्यासाठी यापूर्वी प्रशासनाने मंगेश भालेकर आणि प्रविण आमरे यांची निवड केली होती. परंतु, प्रत्यक्षात या दोघांच्या माध्यमातून महापालिका शाळांमधील मुलांना प्रशिक्षण देण्यात आले नाही. धवल कुलकर्णी यांच्या महापालिकेतील या सत्कारानंतर त्याला विचारले असता, त्याने मात्र महापालिका शाळांमधील मुलांमधून चांगले क्रिकेटपटू घडू शकतात. महापालिकेची स्वत:ची मैदाने आहेत, तसेच त्यासाठी लागणारी व्यवस्थाही आहे. त्यामुळे जर आपल्याला संधी मिळाली तर निश्चितच आपण याचा विचार करू. किंबहुना मला या गरीब घरातील मुलांना शिकवायला आवडेल, असेही धवल कुलकर्णी यांनी सांगितलं. 

याबाबत बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षा सान्वी विजय तांडेल यांनी, यासाठी आपण प्रयत्न करून महापालिका शाळांमधील मुलांना क्रिकेटचे उत्तमोत्तम प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करू, असं सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा