Advertisement

मरणानंतर धर्मा पाटील यांचं नेत्रदान, एका नेत्रहीनाला मिळाली दृष्टी


मरणानंतर धर्मा पाटील यांचं नेत्रदान, एका नेत्रहीनाला मिळाली दृष्टी
SHARES

मंत्रालयात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी रविवारी जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पण मरणानंतर आपण अवयवस्वरुप या जगात रहावं या भावनेतून त्यांनी आपले अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता.


धर्मा पाटील यांचं नेत्रदान

त्याप्रमाणे, धर्मा पाटील यांचं नेत्रदान करण्यात आलं आहे. रविवारी रात्री जे. जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करून धर्मा पाटील यांचे डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला लावण्यात आले असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षकांनी दिली आहे.

धर्मा पाटील यांच्या डोळ्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे डोळे प्रत्यारोपण करण्यासाठी योग्य असल्याचं तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर जे जे रुग्णालयात  शस्त्रक्रिया करण्यात आली. नेत्रदान करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव कायद्यानुसार गुप्त ठेवण्यात आलं आलं आहे.


का केला होता आत्महत्येचा प्रयत्न?

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी अखेर जे. जे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तर, योग्य तो मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकऱ्यांचा दर्जा देण्याचं आश्वासन लेखी स्वरुपात मिळत नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचं त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा