Advertisement

महिला आयोग ६ डिजीट नवीन हेल्पलाइन नंबर सुरू करणार

सध्याच्या धावपळीच्या जगात महिलांना एकट्यानं प्रवास करणं कठीण होताना पाहायला मिळत.

महिला आयोग ६ डिजीट नवीन हेल्पलाइन नंबर सुरू करणार
SHARES

सध्याच्या धावपळीच्या जगात महिलांना एकट्यानं प्रवास करणं कठीण होताना पाहायला मिळत. अनेकदा प्रवास करताना निर्मनुष्य रस्त्यांवर चालतान अत्याचाऱ्यांचा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळं महिलांची या त्रासापासून सुटका व्हावी यासाठी पोलिसांनी हेल्पलाइन नंबर कार्यान्वित केले आहेत. अशातच आता महिलांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी महिला आयोगदेखील लवकरच नवीन हेल्पलाइन नंबर सुरू करणार आहे.

महिला आयोग महिलांच्या सुरक्षेत आणखी वाढ होण्यासाठी नवीन हेल्पलाइन नंबर सुरू करणार आहे. लक्षात राहावा आणि पटकन डायल करता यावा यासाठी नवा टोल फ्री नंबर सहा अंकी असणार आहे. याआधी महिलांना तत्काळ मदतीचा हात मिळावा यासाठी पोलिसांनी १०३ आणि मुंबईबाहेर ११२ हा हेल्पलाइन नंबर कार्यान्वित केले आहेत.

लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, ओळखीच्यांकडून होणारी पिळवणूक अशा अडचणीत सापडलेल्या महिलांना झटपट मदत मागता यावी यासाठी राज्य महिला आयोगाची ‘सुहिता’ ही टोल फ्री हेल्पलाइन कार्यान्वित आहे. मात्र हा हेल्पलाइन क्रमांक ७४७७७२२४२४ असा १० अंकी आहे.

पोलिसांचा हेल्पलाइन नंबर ३ अंकी असल्यानं तो लक्षात ठेवण्याबरोबर पटकन डायल करणे सोयीचे ठरते. याच धर्तीवर महिला आयोगानेदेखील आपला टोल फ्री हेल्पलाइन नंबर कमी अंकी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

काही तांत्रिक बाबींचा अडथळा दूर झाल्यानंतर आयोगाच्या वतीने नवीन टोल फ्री नंबर महिलांसाठी सुरू करण्यात येणार असून 155209 असा तो नंबर असणार आहे.

१० अंकी नंबर लक्षात ठेवून आपत्कालीन परिस्थितीत तो डायल करणे बऱ्याचदा महिलांना कठीण होते. ग्रामीण भागातील महिलांची तर खूपच गैरसोय होते. त्यामुळं महिला आयोगाचा टोल फ्री नंबरदेखील अधिक सुटसुटीत व सोयीचा व्हावा म्हणून तो ६ अंकी करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तो सुरू होईल आणि महिलांना हे फायद्याचे ठरेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा