Advertisement

डिझेल दरवाढीचा फटका एसटी महामंडळालाही मोठा फटका


डिझेल दरवाढीचा फटका एसटी महामंडळालाही मोठा फटका
SHARES

मुंबईसह देशभरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल व डिझेलनं नव्वदी पार केली आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढीव किमतीचा सामन्यांना फटका बसला असून, एसटी महामंडळालाही मोठा फटका बसत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, दररोज सरासरी १ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. इंधन दरवाढीमुळे आर्थिक फटका बसत असल्याने नुकतीच मालवाहतुकीच्या दरातही वाढ करण्यात आली होती.

इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मोठा फटका बसत आहे. एसटी महामंडळही यातून सुटले नाही. जानेवारी २०२० मध्ये १८ हजार ‘एसटी’ गाडय़ा धावत असल्याने महामंडळाला प्रतिदिन १२ लाख लिटर डिझेल लागत होते. त्या वेळी डिझेलचा दर प्रति लिटर ६६ रुपये इतका होता. जानेवारी २०२१ मध्ये एसटीला प्रतिदिन ९ लाख लिटर डिझेल लागत आहे. मात्र डिझेलचा दर प्रति लिटर ७७ रुपये इतका झाला आहे.

प्रवासी संख्या कमी असल्याने केवळ १४ हजार एसटी गाड्या धावत आहेत. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत यंदा दररोज सरासरी १ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या दरवाढीमुळे जानेवारी महिन्यात एसटीला सुमारे ३० कोटी रुपयांचा अतिरिक्त तोटा सहन करावा लागला आहे.

प्रवासी संख्या कमी झाल्याने महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून कमी उत्पन्न मिळत आहे. टाळेबंदीआधी दैनंदिन ६५ लाख प्रवासी संख्या होती. त्यातून दररोज २१ ते २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. आता २७ लाख प्रवासी संख्या झाली असून १५ ते १६ कोटी रुपये उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातच इंधन दरवाढीची भर पडत आहे.

त्यामुळे काही दिवसांपूर्वीच महामंडळाने मालवाहतुकीच्या प्रति किलोमीटर दरात चार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि ११ जानेवारीपासून नवीन दरवाढ लागू केली. नवीन दरानुसार मालवाहतुकीसाठी प्रति किमी ४२ रुपये दर आकारला जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा