Advertisement

मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 'इतकी' वाढ, डिझेल १००च्या पार

निवडणुकांमुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या नव्हत्या. पण निवडणुका झाल्यानंतर दरवाढ करण्यात आली आहे.

मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 'इतकी' वाढ, डिझेल १००च्या पार
(File Image)
SHARES

मागील 9 दिवसांत आज आठव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये ८० पैशांनी वाढ झाली आहे. नव्या दरानुसार मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर ११५.८८ रुपयांवर तर डिझेल १००.१० रुपयांवर गेले आहे.

मार्चमध्ये यूपीसह ५ राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. या काळात म्हणजेच नोव्हेंबर ते मार्चदरम्यान कच्च्या तेलाच्या किमती ७२.६ तब्बल टक्क्यांनी वाढल्या होत्या. तरीही निवडणुकांमुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या नव्हत्या.

मात्र, १० मार्चला निवडणूक निकाल लागले. त्यानंतर मागील १२ दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही इंधनाच्या किमती मात्र वाढू लागल्या आहेत. मंगळवारी कच्च्या तेलाचे दर ६.७९ टक्क्यांनी खाली येत १०४.८४ डॉलर/बॅरलवर आले. हे दर पूर्वीच्या सर्वोच्च पातळीपेक्षा ३१% कमी आहे. तरीदेखील इंधनाचे दर मात्र सातत्याने वाढत आहेत.
आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे ८० पैशांची तर डिझेलच्या दरातदेखील ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ११५.०४ रुपये तर डिझेल ९९.२५ रुपयांवर पोहोचले आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती त्यांच्या फेब्रुवारीच्या उच्चांकी १४० डॉलर प्रति बॅरलवरून १०३ डॉलरवर घसरल्या आहेत. तरीही गेल्या नऊ दिवसांत तेल कंपन्यांनी आठवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. तेल कंपन्यांचे हे धोरण पाहता भाववाढीचा हा क्रम पुढील १५ दिवस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे.

  Other Metro Cities:

शहर
पेट्रोल (per litre)
डिझेल (per litre)
दिल्ली
101.01
92.27
कोलकाता
110.52
95.42
चेन्नई
106.69
96.76
बंगलुरू
106.42
90.50

जून २०१० पर्यंत सरकार पेट्रोलचे दर ठरवत असे आणि दर १५ दिवसांनी त्यात बदल होत असे. २६ जून २०१० नंतर सरकारनं पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. त्याचप्रमाणे ऑक्टोबर २०१४ पर्यंत डिझेलचे दरही सरकारनं निश्चित केले होते.

१९ ऑक्टोबर २०१४ पासून सरकारनं हे काम तेल कंपन्यांकडे सोपवले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवतात.



हेही वाचा

सर्व टोल प्लाझा हटवले जाणार, नितीन गडकरींची घोषणा

महाराष्ट्र अंधारात जाण्याची भिती, वीज कर्मचारी संपावर ठाम

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा