महाकाली परिसरात कचऱ्याचा ढीग

 Andheri
महाकाली परिसरात कचऱ्याचा ढीग

अंधेरी - महाकाली रोड ते तक्षिला बेस्ट बसच्या थांब्यापर्यंत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडून आहेत. रस्त्यावर सर्वत्र कचरा पसरल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे विभागात रोगराई पसरण्याची भीती आहे. कचरा सर्वत्र रस्त्यावर पडल्याने नागरिकांना ये-जा करतानही गैरसोय होत आहे. या परिसरात पालिका शाळा आणि रूग्णालयांचा सामावेश आहे. कचऱ्यातून मार्गक्रमण करण्याची वेळ रूग्ण, महिला, जेष्ठांवर आली आहे. मागील कित्येक दिवसांपासून कचरा उचलण्याची गाडी येथे फिरकली नाही. हा कचऱ्याचा ढीग वाढतच जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच पालिका के पूर्व विभागाचे दुर्लक्ष होत अाहे अशी तक्रारही त्यांनी केली. "पालिकेची गाडी कचरा उचलण्यास येते. कधी एक-दोन दिवसाआड येते. नागरिक कधी कधी कचरा कचराकुंडीत टाकण्याएेवजी बाहेर रस्त्यावर टाकतात. नागरिकांनीही थोडी काळजी घेतली पाहिजे," असे स्थानिक आमदार रमेश लटके यांनी सांगितले.

Loading Comments