लालबाग फ्लायओव्हरचं गर्डर सरकलं


लालबाग फ्लायओव्हरचं गर्डर सरकलं
SHARES

लालबाग- लालबाग फ्लायओव्हरचा गर्डर (लोखंडी खांब) सरकल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे सकाळी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आता त्यावरून एका दिशेनं हलक्या वाहनांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे.  जड वाहनांचा प्रवेश मात्र अजूनही बंदच आहे. 2011 मध्ये हा फ्लायओव्हर बांधण्यात आला होता. या पुलावरून प्रवास करणाऱ्या कारचालकाने हे पाहिलं, आणि कंट्रोल रुमला कॉल करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर लगेचच इथली वाहतूक थांबवण्यात आली.

संबंधित विषय