Advertisement

मल्हार प्रतिष्ठानकडून आदीवासी पाड्यात जीवनाश्यक वस्तूंचे वाटप


मल्हार प्रतिष्ठानकडून आदीवासी पाड्यात जीवनाश्यक वस्तूंचे वाटप
SHARES

कोरोना प्रादुर्भाव काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, अनेकांचे रोजगार बुडाले अशातच पालघर जिल्ह्यातील काही आदिवासी पाड्यावरील नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले. हातावर पोट असणा-या सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात म्हणून मल्हार प्रतिष्ठानकडून नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंची वाटप करण्यात आले.

नुकताच हिवाळा सुरु झाला असून थंडीचे दिवस वाढत आहे. अशातच या आर्थिक विवंचनेत असणाऱ्या आपल्या आदिवासी पाड्यावरील बांधवांना शहरी भागातील जागृत संस्था/सामाजिक कार्यकर्त्यांनी "मायेच पांघरुण व मायेची ऊब" या उपक्रमाअंतर्गत ब्लँकेट , कपडे , जीवनावश्यक वस्तू, मास्क वाटपाचा कार्यक्रम  तांदुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील उचावली येथे मल्हार प्रतिष्ठान माझगाव   यांच्या सौजन्याने वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. मल्हार प्रतिष्ठान माझा मुंबई गेली ४ वर्षे विविध सामाजिक कार्य करत असुन संस्थेने मुंबईत ८०ते ९० ठिकाणी मोफत आरोग्य शिबीर घेतले. तसेच अंधशाळा, वृद्धाश्रम, कर्करोग रुग्णांना अनेक ठिकाणी विविध वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश सोनवणे असुन स्वतः भविष्यात अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून प्रतिष्ठानचे सचिव  गणेश काळे यांनी समस्थ ग्रामस्थांच्या आभार मानले ‌.

   या कार्यक्रमात मा.शिरस्तेदार, उच्च न्यायालय विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पंडीत, उपसरपंच उज्वला जैन, व पोलीस पाटील सुजित पाटील यांनी मोलाची मेहनत घेतली. यावेळी मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश सोनवणे, सचिव गणेश काळे, सरचिटणीस यशवंत मुणगेकर, खजिनदार उमेश सोनवणे, उपाध्यक्ष शिवाजी सोळस्कर,चेतन जैन, जगदीश भाई, संतोष सकपाळ, सफाळे पोलीस ठाण्यातील पोलीस विशाल विसावे, शिवपाल प्रधाने यांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा