• रूग्णालय प्रशासनाची असंवेदनशीलता, नवजात शिशुसोबत वडिलांचा ट्रकने प्रवास
  • रूग्णालय प्रशासनाची असंवेदनशीलता, नवजात शिशुसोबत वडिलांचा ट्रकने प्रवास
SHARE

मुंबई - अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने तीन-चार तास आधी जन्मलेल्या तान्हुल्याला घेऊन एका बापाला ट्रेनचे धक्के खावे लागले. या रखरखत्या उन्हातून आपल्या बाळाला घेऊन एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी ट्रनने प्रवास करावा लागला. बातमीचा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या चिमुकल्याचं रडणं ऐकून तुम्ही भावूक व्हाल. लाजिरवाणी गोष्ट म्हणजे ही घटना कुठल्या गावातली नाही तर मुंबईसारख्या स्मार्ट सिटीत घडली आहे.

भाईंदरच्या सरकारी रुग्णालयात 13 एप्रिलला रामतिलक पटवा यांच्या पत्नीनं भीमसेन जोशी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. पण बाळाच्या पुढच्या उपचारासाठी रुग्णालयात सोईसुविधा नसल्याचं रामतिलक यांनी सांगितलं. त्यामुळे डॉक्टरांनी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात बाळाला दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रामतिलक बाळाला घेऊन शताब्दी रुग्णालयात गेले. तिकडे बाळाचे चेकअप केल्यानंतर बाळ ठीक असल्याचं शताब्दीतल्या डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे रामतिलक बाळाला घेऊन पुन्हा भाईंदरच्या रुग्णालयात जाण्यासाठी निघाले. पण परत येताना त्यांना अॅम्ब्युलन्सच उपबल्ध झाली नाही. दुर्दैवाने यावेळी रामतिलक यांच्याकडे परत जायला पैसेही नव्हते. म्हणून त्यांनी शताब्दी रुग्णालयातल्या स्टाफकडे मदतीचा हात मागितला. पण रुग्णालयातल्या स्टाफनं बाळाला घेऊन रेल्वेनं प्रवास करा, असा सल्ला दिल्याचं रामतिलक यांनी सांगितलं. त्यामुळे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन रामतिलक यांच्यावर रेल्वेने प्रवास करण्याची वेळ आली.

जेव्हा रामतिलक आपल्या तान्हुल्याला घेऊन रेल्वे स्टेशनवर गेले तेव्हा त्यांना पाहून लोकांना संशय येऊ लागला की, त्यांनी मुलाचे अपहरण केले की काय? पण रामतिलक यांनी सर्व हकीगत सांगितल्यानंतर सत्य समोर आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या