Advertisement

'देवीला दान नको, पण गरीबांना कपडे द्या'!


'देवीला दान नको, पण गरीबांना कपडे द्या'!
SHARES

प्रभादेवीच्या शिवराम सदन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने यंदाच्या नवरात्रीत एक अनोखा उपक्रम राबवला आहे. वापरात नसलेले, पण घालता येतील असे चांगले कपडे नवरात्रीच्या काळात मंडळाचे सदस्य विभागातून एकत्र करत आहेत. हे जमवलेले सर्व कपडे कर्जत, वाडा, भिवंडीच्या आदिवासी पाड्यावरील आदिवासी लोकांना देण्यात येणार आहेत. 'देवीला दान नको, पण गरिबांना कपडे द्या, त्यांच्यासाठी थोडं तरी करूया' या संकल्पनेवर आधारित मंडळाचे उपाध्यक्ष अमोल मटकर यांनी हा उपक्रम नवरात्री मध्ये 9 दिवस राबवला आहे.



या मंडळाच्या देवीला यंदा 52 वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी मूर्तिकार चिरनेकर देवीची मूर्ती घडवतात. 5.5 फूट उंचीची ही देवीची मूर्ती शाडू मातीची असून आकर्षक आहे. मंडळातील मुलांनी एकत्र येऊन कागदापासून निसर्गाचे महत्व पटवून देणारा इको फ्रेंडली देखावा साकारला आहे.  चिमुकल्यांनी केलेली सजावट सध्या बघ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

यंदा निमंत्रण पत्रिकेसोबतच इच्छुकांनी कपडे मंडळाला दान करावेत, असे पत्रक विभागात वाटण्यात आले आहे. त्यामुळे लोकांचा मंडळाला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. यंदाचा हा अनोखा उपक्रम मंडळाच्या सदस्यांमुळे यशस्वी झाला आहे. विभागामध्ये 90 टक्के लोकांनी या ठिकाणी कपडे आवर्जून दान केले आहेत.

गतवर्षी मंडळाने आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप केले होते. उत्सवादरम्यान येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला तुळशीचे रोप भेट देणे ही मंडळाची अनेक वर्षांची प्रथा आहे. आज पुढील पिढीने ही प्रथा अशीच जपली आहे.

प्रत्येक मंडळाने उत्सवाच्या निमित्ताने समाजकार्य केले, तरीही आपल्या देशातल्या आदिवासी लोक किंवा गरीब जनतेला थोडा फार हात भार लागेल. या वर्षी पासून दरवर्षी वस्त्रदानाची ही प्रथा कायम सुरू राहील, अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते अक्षय किर यांनी यावेळी बोलताना दिली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा