Advertisement

डोंगरी इमारत दुर्घटना : ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

डोंगरी इथं बुधवारी चार मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

डोंगरी इमारत दुर्घटना : ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू
SHARES

डोंगरी इथं बुधवारी चार मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी मुमताज सुधानवाला नावाची ही महिला ढिगाऱ्याखाली अडकली होती. तिच्यासोबत ६ जण अजून अडकले होते. त्या सर्वांची सुटका झाली. पण मुमताज या ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

वृत्तानुसार, इमारतीत १२ भाडेकरू होते. ज्यात ८ रहिवासी आणि ४ व्यावसायिकांचा समावेश होता. म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इमारतीत ४० हून अधिक रहिवासी राहत होते. पण इमारतीला तडे गेल्याचं समजताच रहिवाश्यांनी इमारत खाली केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुमताज सुधनवाला हिचे नातेवाईक मुंब्रामध्ये राहायचे. मात्र ती एकटी या इमारतीत राहत होती.  

यापूर्वी बुधवारी २ सप्टेंबर रोजी मुंबईच्या पहाटेच्या सुमारास डोंगरीमध्ये इमारतीचा मागील भाग कोसळला. अन्य बातम्यांनुसार, बुधवारी पहाटे नालासोपारा, मुंबई इथंही पुनर्विकासाची निवासी इमारत कोसळली. मागील आठवड्यात, अशाच एका घटनेत भायखळा इथली ग्राउंड-प्लस-टू स्ट्रक्चरची दुसरी इमारत कोसळली. यात दोन जण जखमी झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा