• जगायचा संदेश देऊन मारलं
  • जगायचा संदेश देऊन मारलं
SHARE

प्रभादेवी - पालिकेचा दुतोंडीपणाचा कारभार उघडकीस आलाय. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरासमोरील झाड वाळल्यानं आधी पालिकेनं त्याला रंगरंगोटी करून त्यावर सेव्ह ट्री म्हणजेच झाडे वाचवाचा संदेश दिला. पण हे झाड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच 27 आणि 28 डिसेंबरला तोडलं आहे. हे झाड मुळासकट तोडल्यानंतर स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात जी दक्षिण विभागाच्या वॉर्ड ऑफिसर भाग्यश्री कापसे यांच्याशी संपर्क साधला असता झाडतोडीचं खापर त्यांनी चक्क मेट्रो प्रकल्पाच्या माथ्यावर फोडलय. मेट्रो प्रकल्पासाठी काही झाडे तोडण्याची महापालिकेनं परवानगी दिली. त्यापैकीच ते असेल असं कापसे म्हणाल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या