Advertisement

'या' शाळेत शिकले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर


'या' शाळेत शिकले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबरला साताऱ्यातील शाळेतून आपल्या शिक्षणाला सुरुवात केली होती. त्यामुळे राज्य सरकारने हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने विविध संस्था आणि संघटनांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

7 नवंबर 1900 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजवाडा सातारा हायस्कूल (सध्याचे छत्रपति प्रतापसिंह महाराज हायस्कूल) या शाळेत इयत्ता पहिलीला प्रवेश घेतला होता. सन 1904 पर्यंत बाबासाहेबांनी याच शाळेत आपले शिक्षण घेतले. त्यानंतर अनेकांनी साताराच्या प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी आले. कास्ट्राइबचे नेते कृष्णा इंगळे यांनी नुकतेच या शाळेला भेट दिली.

बाबासाहेब यांनी पहिल्यांदा इंग्रजीमध्ये स्वाक्षरी केलेला रजिस्टर आजही सांभाळून ठेवण्यात आला आहे. हा तर ऐतिहासिक दस्तावेज जोपासण्याची संधी असल्याचे कृष्णा इंगळे यावेळी म्हणाले. या शाळेत फी भरून त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यामुळे पुढे त्यांनी राज्यघटनेत मागासवर्गीयांना आरक्षण मिळवून दिले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा