Advertisement

मंत्रालयातील लॉबीत किंवा कॉरिडॉरमध्ये चहा पिण्यास बंदी

सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी राज्य सरकारकडून हे निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रालयातील लॉबीत किंवा कॉरिडॉरमध्ये चहा पिण्यास बंदी
SHARES

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना लॉबीत किंवा कॉरिडॉरमध्ये उभं राहून चहा पिता येणार नाही. याबाबत राज्य सरकारनं निर्णय घेतला असून, मागील काही दिवसांपूर्वी ड्रेसकोडचा निर्णय घेतला होता. सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी राज्य सरकारकडून हे निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चांगल्या प्रतीच्या वर्तणुकीची तसंच, व्यक्तिमत्वाची सर्वसामान्य नागरिक अपेक्षा करतात. अशात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय किंवा गबाळी असल्यास त्याचा परिणाम एकंदर कामकाजावर देखील होतो. म्हणूनच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दैनंदिन पेहराव कसा असावा याबाबत सरकारकडून आता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.

राज्यातून अनेकजण मंत्रालयात आपल्या कामासाठी येत असतात. त्यावेळी मंत्रालयात कर्मचारी किंवा अधिकारी लॉबीत, कॉरिडॉर किंवा जिन्यावर चहा कॉफी पिताना आढळतात. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी मंत्रालयाच्या कॉरिडॉर किंवा लॉबीत चहा न पिण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा