Advertisement

पुन्हा साठा संपला; 'बीकेसी'मध्ये लसीकरण स्थगित

वांद्रे-कुर्ला संकुल केंद्रातील लसीकरण लशीचा साठा संपल्यामुळं बुधवारी स्थगित ठेवण्यात आलं आहे.

पुन्हा साठा संपला; 'बीकेसी'मध्ये लसीकरण स्थगित
SHARES

वांद्रे-कुर्ला संकुल केंद्रातील लसीकरण लशीचा साठा संपल्यामुळं बुधवारी स्थगित ठेवण्यात आलं आहे. महापालिकेला १.२५ लाख लशींच्या मात्रा मिळाल्या असून, सर्व केंद्र कार्यान्वित होत असल्याचं महापालिकेनं नुकतंच जाहीर केलं होतं. यानंतर पुढच्या दोनच दिवसांत बीकेसी लसीकरण केंद्रातील साठा संपला आहे. त्यामुळं बुधवारी केंद्रात लसीकरण होणार नाही.

२ दिवसांपूर्वी १२ हजार मात्रा मिळाल्या होत्या. दिवसाला जवळपास ५५०० ते ६००० जणांचं लसीकरण केंद्रावर केलं जातं. त्यामुळं हा साठा २ दिवसांत संपला आहे. त्यामुळं पुढील साठा मिळेपर्यत लसीकरण स्थगित केल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिकेनं मंगळवारी ८० हजार मात्रा सर्व लसीकरण केंद्राना पुरविल्या असून, सध्या साठा शिल्लक नाही. त्यामुळं एखाद्या लसीकरण केंद्रावरील साठा संपल्यास आता पुढील साठा येईपर्यत वाट पाहावी लागेल. बुधवारी काही साठा येण्याची शक्यता असल्याचं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा